नागपूरच्या महाराज बागेत दोन शाही पाहुणे

November 9, 2008 3:18 PM0 commentsViews: 13

9 नोव्हेंबर, नागपूर प्रशांत कोरटकरनागपूरमधील महाराज बाग प्राणी संग्रहालयात दोन शाही पाहुणे आले आहेत. ते पाहुणे आहेत वाघाचे बछडे. या प्राणी संग्रहालयातील एकमेव वाघाचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर महाराज बागेत इतक्या वर्षांनी आलेल्या बछड्यांना पाहण्यासाठी नागपूरकरांची एकच गर्दी केली आहे. वाघाची बछडी ताडोबाच्या जंगलातून चुकून बाहेर आली असावीत, असा अंदाज आहे. नागपूरच्या महाराज बागेत दोन वाघाची पिल्लं आल्याची बातमी कळताच अनेकांची तिथे गर्दी केली आहे. याबाबत वाघांवर जीवापाड प्रेम करणारे शैलेश चौधरी म्हणाले की सात-आठ वर्षाआधी टायगर होता. आता दुसर्‍या प्राणी संग्रहालयातून मादी वाघ आणल्यास जास्त बछड्यांची संख्या वाढू शकते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या दोन वाघांना नागपुरात उपचारासाठी आणलं. यापैकी एका पिल्लाची तब्बेत जास्तच खराब आहे. या पिल्लांवर महाराजबागेतले डॉक्टर्स उपचार करत आहेत. महाराजबागेत वाघ नसल्यानं इथे येणार्‍यांची संख्या रोडावली होती. पण आता या दोन बछड्यांमुळे या प्राणीसंग्रहालयाला शान आली आहे.

close