बालगंधर्व चित्रपट करणे हेच मोठ समाधान !

April 22, 2011 4:27 PM0 commentsViews: 5

22 एप्रिल

नितीन देसाईंचा नवीन सिनेमा बालगंधर्व लवकरच रिलीज होत आहे. आणि हा चित्रपट करणे हेच मोठं समाधान होतं अशी भावना या सिनेमामध्ये बालगंधर्वांची भूमिका साकारणार्‍या सुबोध भावेने व्यक्त केली. बालगंधर्व सिनेमाच्या टीमने आज पुण्यामध्ये पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हरिश्चंद्राची फॅक्टरी मध्ये फाळकेंच्या पत्नीचा रोल करणारी विभावरी देशपांडे या चित्रपटातही बालंगधर्वांच्या पत्नीची भुमिका साकारत आहे. तर या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी महेश लिमयेंनी केली आहे.

close