जैतापूर प्रकल्पविरोधकांचा तारापूर ते जैतापूर मोर्चा

April 23, 2011 10:28 AM0 commentsViews: 2

23 एप्रिल

आज शनिवारी तारापूर इथून अणुउर्जा विरोधकांचा मोर्चा निघणार आहे. दोन दिवसांमध्ये 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा जैतापूरला पोहोचणार आहे. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तिथले प्रकल्प पीडित या मोर्चात सामील होणार आहेत. याशिवाय वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच. एम. देसरडा असे सामाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत आहेत. दरम्यान वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांनाही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे हे दोघेही या बंदीचा आदेश मोडून रविवारी रत्नागिरीत प्रवेश करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

close