न्या. संतोष हेगडेंनी घेतली नरमाईची भूमिका

April 23, 2011 9:26 AM0 commentsViews:

23 एप्रिल

जन लोकपाल समितीच्या जनप्रतिनिधींची आज संध्याकाळी 6 वाजता नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अण्णा हजारेही दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जनप्रतिनिधींवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी माजी न्यायमूर्ती संतोष हेगडे यांच्या राजीनाम्याबाबतही चर्चा होणार आहे. दिग्विजयसिंग यांच्या आरोपानंतर संतोष हेगडे यांनी लोकपाल समितीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती संतोष हेगडेंनी आता नरमाईची भूमिका घेतली असून आपल्याला अण्णांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असं स्पष्ट केलंय.

close