नाशकात बच्चेकंपनीसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ अनोखा उपक्रम

April 23, 2011 11:08 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल

जागतिक ग्रंथ दिनानिमत्ताने नाशिकमध्ये बालदोस्तांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्वास प्रबोधिनीच्या यशवंतराव चव्हाण ग्रंथालयाच्या वतीने बाल दोस्तांसाठी 'ग्रंथ तुमच्या दारी 'या अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. यात नाशिकमध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी मुलांसाठी पुस्तकांच्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मुलांना पुस्तकांची गोडी वाटावी आणि वाचनाची आवड वाढावी हा त्यामागचा उद्देश आहे.

close