ऑस्ट्रेलियापुढे 382 रन्सचं टार्गेट

November 9, 2008 3:34 PM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबर , नागपूरभारताची दुसरी इनिंग 295 रन्समध्ये ऑल आऊट झाली. आता भारतानेऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 382 रन्सचं टार्गेट ठेवलंय. दिवसाच्या सुरूवातीपासूनच सेहवागनं सूत्र हाती घेतली होती. विशेषतः त्यानं जेसन क्रेझाला लक्ष्य बनवलं. भारताचा नवखा ओपनर विजयनंही सेहवागला चांगली साथ दिली त्यांनी पहिल्या विकेटसाठी 116 रन्सची भक्कम पार्टनरशिप उभी केली. राहुल द्रविडचा खराब फॉर्म सुरूच आहे या इनिंगमध्ये तो फक्त 3 रन्स करू शकला तर लक्ष्मणने चार रन्स केले. गांगुलीचा शेवटचा डाव शून्यावर संपला. सचिन रन आउट झाल्यामुळे टी टाइम होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंवर दबाव वाढत होता. भारताकडे फक्त 252 रन्सची आघाडी होती आणि धोणीची साथ द्यायला उरले होते तळाचे बॅट्समन. यावेळी हरभजन धोणीच्या मदतीला धावला. दोघांनीही आपापल्या हाफ सेंच्युरी पूर्ण केल्या. अखेर भारताचा डाव 295वर संपला.आता शेवटच्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 382 रन्सचं टार्गेट भारतानं उभं केलं आहे.

close