दिल्ली विजयाच्या शोधात पंजाबला भिडणार

April 23, 2011 11:15 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल

आयपीएलमध्ये आज शनिवारी फक्त एकच मॅच रंगणार आहे. या मॅचमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मुकाबला असेल तो फॉर्मात असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी. वीरेंद्र सेहवागची दिल्ली डेअरडेव्हिल्स सध्या विजयाच्या शोधात आहे. चार मॅचमध्ये दिल्लीला तीन पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे पॉईंटटेबलमध्येही दिल्लीची टीम अगदी तळाला आहे. याउलट पहिली मॅच गमावल्यानंतर किंग्ज इलेव्हन टीमने भरारी घेतली. सलग तीन विजय मिळवत पंजाब टीम थेट तिसर्‍या क्रमांकावर पोहचली आहे. आणि सध्या पॉल वॉल्थटी टीमचा हुकमी एक्का ठरतोय.

close