विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा एकाचा मृत्यू

April 23, 2011 11:27 AM0 commentsViews: 2

23 एप्रिल

हिंगोली शहर आणि परिसरात काल शुक्रवारी संध्याकाळी वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

शहर परिसर आणि कन्हेरगावसह आजुबाजूच्या काही भागात सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. सेनगाव तालुक्यातील खुदाच येथे लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. अनेक घरांची छपरं उडाली असून आता प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे चालू आहेत.

तर नागपूरातही वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. जिल्हयातील सावनेर, काटोल, कळमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीमुळे गहु, संत्रा आणि हरभरा अशी हंगामी पीक या अवकाळी पावसामुळे नष्ट झाली आहेत. शिवाय या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली.

close