सत्यसाईबाबा यांची प्रकृती गंभीर

April 23, 2011 11:32 AM0 commentsViews: 1

23 एप्रिल

अध्यात्मिक गुरू सत्यसाईबाबा यांची प्रकृती जास्त चिंताजनकच झाली आहे. पुट्टपर्थीमधील सत्यसाई सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सध्या बाबांवर उपचार सुरू आहेत. बाबांच्या ह्रदय, किडणी आणि लिव्हर यांचं काम अतिशय मंदावलं असून त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. 27 डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. मात्र उपचारांना प्रतिसाद अतिशय संथ असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक ए. एन सफाया यांनी दिली. 28 मार्चला सत्यसाई बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाबांची प्रकृती बरी व्हावी यासाठी त्यांचे जगभरातले भक्त प्रार्थना करताहेत.

close