हेल्मेंट सक्ती मोहिमेत पावतीचा पहिला मान पोलिसांचाच !

April 23, 2011 11:44 AM0 commentsViews: 4

23 एप्रिल

दुचाकी चालवणार्‍या प्रत्येकाला हेल्मेट घालण्याचा नियम असला तरी वाहन चालक त्याची पर्वा करत नाहीत. नागपुरात कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हेल्मेट ची सक्ती केली खरी, पण काही दिवसातच या योजनेचे बारा वाजले. त्यावर आता पोलिसांनी एक अनोखा उपाय शोधला आहे. त्यांनी स्वत:पासूनच हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.

चक्क पोलीसच दुसर्‍या पोलिसाकडून दंड वसूल करण्याचे दुर्मिळ दृश्य आपण पहिलं नसेल. पण हा प्रकार नागपुरात घडला आहे. पाहणार्‍यांच्या डोळ्यावर कदाचित विश्वास बसला नाही. पण वाहतूक शाखेत काम करणार्‍या अमित शर्माला हेल्मेट न घातल्यामुळे ड्युटीवर जाता जाताच सकाळीच दंड भरावा लागला.

दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीचा निर्णय नागपूर कोर्टांने दिला होता. पण काही दिवसातच लोक त्याविरोधात रस्त्यावर उतरले. त्यावर आता उपाय म्हणून पोलिसांनी स्वत:पासूनच याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना सध्या बिना हेल्मेटचे पोलीस कर्मचारी शोधण्याचे काम माग लागले आहे. आता चौकाचौकात पोलीस हेल्मेंट न घातलेला कर्मचारी आढळला की दंडाच्या पावत्या फाडतात.

डोक्याला मार बसल्याने अनेकदा दुचाकीस्वारांचाअपघातात बळी गेल्याच्या घटना घडत असतात. हे लक्षात घेऊनच हेल्मेट सक्तीचा फॉर्म्युला पोलिसांनी आपल्यापासून सुरू केला आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही हेल्मेटसक्ती होणार एवढं मात्र खरं.

close