न्या. संतोष हेगडे समितीत राहणार !

April 23, 2011 2:35 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल

जन लोकपाल विधेयकातील जनप्रतिनिधी न्या. संतोष हेगडे हे या समितीमध्ये राहणार असल्याचं आता निश्चत झालंय. न्या. हेगडे यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी जाहीर टीका केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या न्या. हेगडे यांनी राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

पण अखेर आज किरण बेदी यांनी जाहीर केलं की, न्या. हेगडे राजीनामा देणार नाहीत. न्या. हेगडे हे पंतप्रधान आणि सरन्यायाधीशानाही पत्र लिहिणार आहेत. यासोबतच मायावतींच्या मागणीनुसार, समितीमध्ये एक दलित मंत्री घेण्याच्या सूचनेचं अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केलं आहे. या विधेयकाविषयीच्या सूचना नागरिकांनी lokpalbilconsultation@gmail.com या इमेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आलंय.

close