‘तारापूर ते जैतापूर ‘मोर्चा तारापूरमध्ये पोलिसांनी अडवला

April 23, 2011 2:50 PM0 commentsViews: 5

23 एप्रिल

जैतापूर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज देशभरातील कार्याकर्त्यांनी एकत्र येऊन तारापूर ते जैतापूर यात्रेचं आयोजन केलंय. ही यात्रा आज सुरू होऊन 26 तारखेला जैतापूर इथं संपणार आहे. मात्र 'तारापूर ते जैतापूर ' असा हा मोर्चा तारापूर येथेच पोलिसांनी अडवला.

आंदोलक नेते वैशाली पाटील, बी जी कोळसे-पाटील, एच.एम.देसरडा आणि बनवारीलाल शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना बोईसर पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. संपूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी अणुप्रकल्प येत आहेत तेथील प्रकल्प पीडित या मोर्चात सहभागी झाले आहेत. याआधी वैशाली पाटील आणि बी जी कोळसे-पाटील या दोघांवरही रत्नागिरी पोलिसांनी जिल्हाबंदी केली आहे.

close