व्यथित होऊन केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिला – पवार

April 23, 2011 2:54 PM0 commentsViews: 1

23 एप्रिल

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर निदर्शन करत असल्याच पाहिल्यावर व्यथित होऊन आपण केंद्रीय अन्नमंत्री पदाचा राजीनामा दिल्याच शरद पवार यांनी सांगितलं. मीडियाने महागाई संदर्भात केलेली टिका आणि संसदेतील महागाईवरुन झालेला गदारोळाला आपण कधीही घाबरलो नाही. पण माळगाव कारखान्याचे सभासद आपल्या घरासमोर आंदोलन करतांना पाहताच त्याच दिवशी पंतप्रधानांना या जबाबदारीतून मोकळे करण्याची आपण विनंती केल्याचही शरद पवार बारामतीत म्हणाले.

close