20 हजार सचिनमुद्रा..!!

April 23, 2011 2:59 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल

स्वेअर कट मारणारा सचिन… स्ट्रेट ड्राईव्ह मारणारा सचिन.. जिद्दीनं खेळणारा सचिन, तसेच खेळल्यावर देवाला धन्यवाद देणारा सचिन. मैदानातला सचिन, तसाच फॅमिलीसोबतचा सचिन. अशी सचिनच्या एक नाही तर तब्बल 20 हजार मुद्रा नाशिककरांना पाहायला मिळताहेत. नाशिकच्या अस्मिता केळकर यांनी गेल्या 25 वर्षांपासून सचिनमुद्रा संग्रहित केल्या आहे. आचरेकर सरांच्या भेटीनंतर त्यांना ही कल्पना सुचली. रविवारी सचिनचा वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी त्यांनी सचिनला ही अनोखी भेटी दिली. नाशिकच्या महात्मा फुले कलादालनात 25 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन खुलं आहे.

close