अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा भारतावर नाराज ?

November 9, 2008 3:44 PM0 commentsViews: 4

9 नोव्हेंबर, दिल्लीअमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी अजुनही पंतप्रधान मनमोहनसिंग आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना फोन केलेला नाही. त्यामुळे ओबामा भारतावर नाराज तर नाही असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे ओबामा यांनी आतापर्यंत 15 देशांच्या प्रमुखांना फोन केला आहे. यामध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबामा यांनी अमेरिकेच्या सहयोगी देशांना पहिले 9 फोन लावले. शुक्रवारी रात्रीपर्यंत ओबामा पंतप्रधानांना फोन करतील, अशी अपेक्षा होती.पण अजुनही त्यांच्याकडून फोन आलेला नाही. ओबामा यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात न्युक्लिअर टेस्टला विरोध केला होता. पण त्यांच्या पत्राला प्रसिद्धी देतांना भारतानं हा उल्लेख टाळल्यामुळं ओबामा नाराज असल्याचं सांगण्यात येतंय.

close