बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात 77 टक्के मतदान

April 23, 2011 3:26 PM0 commentsViews: 3

23 एप्रिल

पश्चिम बंगालमध्ये आज दुसर्‍या टप्प्यासाठी 50 जागांकरता मतदान झालं. मुर्शिदाबाद, बिरहम आणि नाडिया भागात आज मतदान झालं. या तिन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 77 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलंय. आजच्या मतदानातून नलहाटी मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी हेही रिंगणात होते.

close