कलमाडींवर तरुणाने फेकली चप्पल

April 26, 2011 9:34 AM0 commentsViews: 7

26 एप्रिल

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या सुरेश कलमाडींना आज पतियाळा कोर्टात हजर करण्यात आलं. पण कोर्टात जाताना कलमाडींवर एका तरुणानं चप्पल फेकली. कपिल ठाकूर असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातला आहे. या तरुणाला पोलिसांनीत्याला अटक कऱण्यात आली आहे.

सोमवारी 120 ब आणि 420 म्हणजेच फसवणुकीच्या या कलमाखाली सोमवारी कलमाडींना अटक करण्यात आली. कलमाडींना 14 दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केलीये. कॉमनवेल्थ मधल्या TSR म्हणजेच टाईमर घोटाळ्याप्रकरणी महत्वाची कागदपत्रं CBI च्या हाती लागली होती. तर दिल्लीमध्ये झालेल्या ऑलम्पिक समितीच्या बैठकीचे व्हिडीओ फूटेजही सिबीआयकडे आहे. ललित भानोत यांनी TSR कंत्राट हे स्विस कंपनी ओमेगाला बाजार भावापेक्षा चढ्या किमंतीमध्ये दिले असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत.

close