कलमाडींचे काँग्रेसमधील विरोधक आक्रमक

April 26, 2011 9:50 AM0 commentsViews: 7

26 एप्रिल,

सुरेश कलमाडींच्या अटकेनंतर पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उफाळून आलाय. पुण्यातील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केली. कलमाडीविरोधी गट पुण्यात सक्रीय होऊन त्यांनी ही तोडफोड केल्याचं समजतंय. ही तोडफोड करताना त्यांनी कलमाडींचा निषेध केला. इतकंच नाही तर या कार्यकर्त्यांनी कलमाडींचे पोस्टर्सही फाडले. काँग्रेस भवनमधील वस्तूंचीही तोडफोड केल्याचं समजतंय. दरम्यान पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी या घटनेचा निषेध करत काँग्रेस पक्षाचे आमदार मोहन जोशी यांचं हे कृत्य असल्याचा आरोप केला आहे.

close