सरकार जैतापूर प्रकल्पावर ठाम

April 26, 2011 10:08 AM0 commentsViews: 7

26 एप्रिल

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर सरकार ठाम असल्याची माहिती सूत्रांनी IBN लोकमतला दिली. पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीनंतर सूक्षांनी ही माहिती दिली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश आणि पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री नारायण स्वामी उपस्थित होते.

या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती देण्यासाठी जयराम रमेश दुपारी चार वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, गृहमंत्री आर आर पाटील आणि NPCIL च्या पदाधिका•यांबरोबर जैतापूरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जैतापूरचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अणुसुरक्षेबाबत NPCILकडे काय उपाययोजना आहेत, तसंच मच्छिमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून आणखी काय वाढीव पॅकेज देता येईल, याचीदेखील चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

close