अँटिगनीमध्ये साकारली आहे ग्रीक ट्रॅजिडी

November 9, 2008 3:57 PM0 commentsViews: 8

9 नोव्हेंबर , मुंबई पृथ्वी फेस्टिव्हल दरम्यान पंडित सत्यदेव दुबेजींची अनेक नाटकं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. नाट्यरसिक या फेस्टिव्हलच्या प्रत्येक दिवसाची वाट पाहत आहेत. फेस्टिव्हलच्या तिस-या दिवसाचं आकर्षण होतं मोटली ग्रुपचं अँटिगनी हे नाटक. या नाटकाचं दिग्दर्शन आहे सत्यदेव दुबेंचं. रत्ना पाठक शहा आणि नसिरूद्दिन शहा यांच्या मुख्य भूमिका असलेलं हे नाटक. नाटक बघताना सगळ्यांसमोर एक खरी ग्रीक ट्रॅजिडी उभी राहते. या नाटकातली पात्र एकमेकांशी संवाद साधताना जीवन , मृत्यू , आनंद , प्रेम आणि जबाबदा-या या सर्वाबरोबर तडजोडी करताना दिसतात. अशी दमदार स्टार कास्ट आणि तगडं दिग्दर्शन असलेलं अँटिगनी हे नाटक आहे.

close