महिला कॉन्स्टेबल प्रकरणाचा तपास मैथिली झा यांच्याकडे नको – खडसे

April 28, 2011 10:47 AM0 commentsViews: 40

28 एप्रिल

कोल्हापूरमध्ये लैगिंक शोषण झालेल्या महिला कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घ्या, अशी मागणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास नाशिकच्या महिला आयपीएस अधिकारी मैथिली झा यांच्याकडे द्यायला खडसेंनी विरोध केला आहे. याप्रकरणात आरोप असलेले एसपी यशस्वी यादव, डीवायएसपी परकाळे आणि पोलीस निरीक्षक मुंडे यांची तत्काळ बदली करा अशी मागणीही खडसेंनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासात पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांची मदत घ्या, अशी सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.

close