अजितदादांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांची निदर्शन

April 28, 2011 12:41 PM0 commentsViews: 2

28 एप्रिल

पुण्यात एकीकडे सुरेश कलमाडींनी खासदारकीचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी निदर्शन करण्यात आली आहे. तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. विविध घोटाळ्यात अजित पवार यांचं नाव येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

close