एअर इंडियाच्या वैमानिक संपात 3 अधिकार्‍यांना नोटीस

April 28, 2011 11:20 AM0 commentsViews: 7

28 एप्रिल

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप सलग दुसर्‍या दिवशीही सुरू आहे. संप मागे घ्यायला कमर्शियल पायल्ट्स असोसिएशन म्हणजेच आयसीपीएने नकार दिला आहे. संपामुळे बुधवारपासून 90 फ्लाईट्स रद्द करण्यात आलेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्री वायलर रवी यांनी या संपाबाबत मंत्रिमंडळाला माहिती दिली. संपकरी पायलट्सवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पायलट्सना गलेलठ्ठ पगार मिळतो, त्यामुळे त्यांना संपाचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इंडियन एअरलाईन्स आणि एअर इंडियाचे विलिनिकरण करताना काही गुंतागुंत निर्माण झाली. ती सोडवण्याची गरज वायलर रवी यांनी व्यक्त केली. दरम्यान, संप मागे घेण्याचे कोर्टाचे आदेश पाळले नसल्याने दिल्ली हायकोर्टाने आयसीपीएच्या 3 पदाधिकार्‍यांविरोधात नोटीस बजावली आहे.

close