नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरुन 2 महिलांना अटक

April 28, 2011 12:57 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

नक्षल चळवळीशी संबंधित असल्याच्या आरो़पावरुन राज्य एटीएसने ठाणे आणि पुण्यातून दोन महिलांना अटक केली आहे. अँजला सोनटक्के आणि सुषमा रामटेके अशी या दोघींची नावं आहेत. 25 एप्रिल रोजी पहिल्यांदा ठाणे येथून अँजला हिला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार पोलिसांनी तिच्या पुण्यातील राहत्या घरावर छापा टाकला असता तिथून सुषमा रामटेके या तरुणीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडे नक्षलवादी चळवळीशी संबधित साहित्य सापडल्याचा पोलिसांचा दावा आहे. अँजला हिच्याविरोधात 20 गुन्ह्यांची नांेद आहे. सध्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याची अँजला ही पत्नी आहे. या दोघींना 3 मे पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close