आयबीएन लोकमत इम्पॅक्ट : साखळदंडातून होणार गाढवेची सुटका

April 28, 2011 3:17 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

वर्धा शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजनसरा गावात गेल्या 18 वर्षापासून सुभाष गाढवे या व्यक्तीला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलं आहे. आयबीएन लोकमतने सकाळपासून ही बातमी दाखवल्यानंतर सेवाग्रामच्या डॉक्टरांनी उद्या या गावात भेट देऊन या व्यक्तीला साखळदंडातून सोडवण्याचं आश्वासन दिले आहे. त्याच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च सेवाग्रामचे डॉक्टर करणार आहेत.

वेडाचे झटके येत असल्यामुळे या व्यक्तीला त्यांच्याच कुटुंबीयांवर अशा प्रकारे बांधून ठेवण्याची वेळ आली. सुभाष गाढवे असं या पीडिताचे नाव असून त्याला एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवसात त्याला वेडाचे झटके यायला सुरुवात झाली. त्याच्या उपचारावर घरच्या मंडळीनी बराच खर्चही केला. मात्र सुभाषच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

सुभाषला वेडाचा झटका आला की तो गावकर्‍यांवर हल्ला करायचा, शेवटी कंटाळून घरच्या आणि गावातल्या लोकांनी सुभाषला साखळदंडाने झाडाला बांधून ठेवलंय. त्यानंतर गेल्या 18 वर्षापासून तो असेच जीवन जगतोय. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे ते सुभाषवर उपचारांसाठी अधिक खर्च पेलू शकत नव्हते.

close