पायलट कर्ज घोटाळा प्रकरणी शुक्रवारी आरोपपत्र सादर होणार

April 28, 2011 3:25 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

औरंगाबाद जिल्हा बँकेतील पायलट कर्ज घोटाळ्यातील आरोपींवरचे आरोपपत्र शुक्रवारी गंगापूरच्या दिवाणी कोर्टात सादर होत आहे. याप्रकरणात माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, कृष्णा पाटील-डोणगावकर, सुरेश पाटील, नितीन पाटील या काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे हे आरोपपत्र सादर करण्यात तब्बल अकरा वर्षांचा विलंब झाला. याप्रकरणी आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला आहे.

close