आयपीएलला सुरक्षा देण्यासाठी पोलिसांचा ‘पॉवर प्ले’

April 28, 2011 3:40 PM0 commentsViews: 2

28 एप्रिल

आयपीएल क्रिकेट स्पर्धा रंगात सुरू आहे. मात्र, आता या स्पर्धेचे आयोजक आणि मुंबई पोलीस यांच्या वाद निर्माण झाला आहे. यामुळे आता स्टेडियमच्या आतील सुरक्षा व्यवस्था पुरवण्यापासून मुंबई पोलिसांनी हात वर केले आहेत. स्टेडियमच्या आता आता खाजगी सुरक्षा रक्षक असतील.

मुंबई क्रिकेट असोशिएशन आणि मुंबई पोलीस यांच्याच सध्या वाद सुरु आहे. आयपीएल स्पर्धा सध्या अंतिम टप्यात आहे. यावेळीच हा वाद उभा राहिला आहे. आयपीएलचा हा चौथा हंगाम आहे. आता पर्यंत मुंबई झालेल्या सामन्यांसाठी स्टेडियमच्या आतून आणि बाहेरुन मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असायचा.

मात्र, यापुढे होणार्‍या सामन्यांच्यावेळी पोलीस केवळ बाहेर असतील. स्टेडियमच्या आत एमसीएचे खाजगी सुरक्षा रक्षक असणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सामन्याच्या वेळी मुंबई पोलीस आणि एमसीएच्या पदाधिकार्‍यात वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर एमसीएच्या अधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धती बाबत आक्षेप नोंदवला होता. आज एमसीएचे पदाधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील वरीष्ठ अधिकार्‍यांत बैठक झाली. यात नवा मार्ग काढण्यात आला आहे.

close