वर्ल्ड कप फायनलच्या सुरक्षेचं बिल अडीच कोटी रूपये !

April 28, 2011 3:56 PM0 commentsViews: 1

28 एप्रिल

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप सामन्यादरम्यान मुंबई मध्ये क्रिकेट सामन्यांदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिसांनी पुरवलेल्या सुरक्षाव्यवस्थेचं बिल तब्बल 2 कोटी 65 लाख रुपयांचे झालं आहे. हे बिल आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून एमसीएच्या सेक्रेटरींना देण्यात आलं आहे.

हे बिल भरण्यात यावे अशी विनंती ही एमसीए ला करण्यात आली आहे. वर्ल्ड कप दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये तीन सामने खेळवण्यात आले. पहिला सामना कॅनडा विरुध्द न्यूझीलंड झाला. दुसरा सामना- न्यूझीलंड विरुध्द श्रीलंका. तिसरा आणि अंतिम सामना भारत विरुध्द श्रीलंका दरम्यान झाला.

या तीनही सामन्यांमध्ये 1200 पोलीस आणि अधिकार्‍यांना बंदोबस्ताच्या कामी लावण्यात आलं होतं. तर अंतिम सामन्यात सुमारे 3500 पोलीस सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते. बीडीडीएस स्कॉड, क्यु आरटी एसआरपी या विभागांची पथकही बंदोबस्तात होती. सामन्यासाठी मुंबई वाहतूक पोलिससह आणि अंतिम सामन्याच्या वेळी एनएसजी आणि इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. या दोन कोटींच्या बिलामध्ये या सुरक्षा यंत्रणांच्या खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही.

close