पुण्यात उभारली सर्वात उंच इमारत

April 28, 2011 4:04 PM0 commentsViews: 4

28 एप्रिल

उंच ठिकाणाहुन दिसणारं पुण्याचे दृश्य पाहण्यासाठी आजपर्यंत पुणेकर फक्त पर्वतीच गाठत होते. पण आता मात्र पुण्यामध्ये उभी राहिली आहे ती अशीच एक उंच बिल्डिंग. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुण्याची स्कायलाईन बदलणारी एबीआयआल ग्रुपची गॉड्स ब्लेसिंग्ज ही बिल्डिंग उभी राहिली आहे.

सध्याचा पुण्यातला हा सगळ्यात उंच टॉवर ठरणार आहे. प्रत्येक मजल्यावर फक्त एकच फ्लॅट असे एकुण 24 फ्ल्‌ॅट्स या इमारती मध्ये आहेत. प्रत्येक फ्लॅट आहे 7500 स्क्वेअर मीटरचा. कोल्ड शेल या प्रकारात ही बिल्डिंग बनवण्यात आली आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्विमिंग पुलही आहे. त्याबरोबरच प्लंज पुन, फ्रेंच विंडो, व्हिडिओ सिक्युरिटी सिस्टिम, अशा अनेक सुविधा इथे पुरवण्यात आल्या आहेत.

close