वर्‍हाड जमलंय लंडनला!

April 28, 2011 5:09 PM0 commentsViews: 2

28 एप्रिल

प्रिन्स विल्यम्स आणि केट यांच्या शाही लग्न सोहळ्यासाठी इंग्लंड सज्ज झालं आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये प्रिन्स विल्यम्स आणि केच मिडल्टन विवाहबद्ध होणार आहेत. आता या शाही सोहळ्याला अवघे काही तासच उरले आहेत.

हे शाही लग्न कदाचित काही शतकांमधील वैशिष्ट्यपूर्ण लग्न नसेल, पण काही दशकामंधील मात्र निश्चितच आहे. या सोहळ्यायसाठीचे खास वेश, केक आणि संगीताचीही जय्यत तयारी झाली आहे.

जेवणही या शाही सोहळयाला साजेसं असेच असणार आहे. वधू-वरांना सगळ्यांच्याच शुभेच्छा मिळाव्यात अशी ब्रिटनच्या राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळेच लंडनमधील हिंदू,शीख,जैन,बौध्द आणि मुस्लिम संघटना तसेच धर्मसंस्थांच्या नेत्यांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाचा खर्चही शाही परंपरेला साजेसा होणार हे ओघाने आलंच. ब्रिटिश प्रेसनुसार या सोहळ्याचा एकूण खर्च 82 मिलियन डॉलर ते 163 मिलिअन डॉलरपर्यंतही असू शकतो.आणि वधू आणि वरासाठी काही विशेष जागा भाड्याने घेण्यात आली नाही. बकिंगहॅम पॅलेस तर मोठमोठ्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्धच आहे. आणि त्यामुळेच केटरिंगह इतर गोष्टींचा खर्च या रॉयल फॅमिलीला नवीन नाही.

याचाच अर्थ जिथे शक्य होईल तिथे योग्य त्या प्रकारे ते खर्चाला निश्चितच कात्री लावणार. तर 1981 मध्ये जेव्हा भावी वराच्या वडिलांनी लग्न केलं होतं तेव्हाही त्यांच्या लग्नाचा खर्च 49 मिलिअन डॉलर इतका झाल्याचं बोलण्यात आहे. आणि त्यामुळेच आता जरी हा खर्च त्याच्या दहापटींने वाढला तर त्यात आश्चर्य मानायची गरज नाही.

नवल ते काय त्यातच या शाही विवाहाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारमधील सूत्रांच्या माहितीनूसार या काळातल्या उलाढलींची किंमत आहे केवळ 5 बिलियन डॉलर.

close