सांगलीत शेतक-यांनी साखरकारखान्याचं कार्यालय पेटवलं

November 9, 2008 3:01 PM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर , सांगलीउसाला चांगला भाव मिळावा यासाठी सुरू असलेलं शेतकरी संघटनेचं आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. संतप्त शेतक-यांनी पुन्हा सांगलीमधल्या इस्लामपुरातल्या कुरळक इथलं अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखरकारखान्याचं कार्यालय पेटवून दिलं. काही दिवसांपूर्वी शेतक-यांनी इस्लामपुरमधल्याच सहाय्यक निबंधकांचं कार्यालय पेटवून दिलं होतं. आता उसाच्या भावासंबंधी शासनानं चर्चेची तयारी दाखवली नाही तर पुढच्या टप्प्यात आम्ही मंत्र्यांच्या गाड्याही फोडणार असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

close