कलमाडींबरोबरच केंद्रातील अधिकारीही जबाबदार !

April 28, 2011 5:44 PM0 commentsViews: 4

28 एप्रिल

टायमर घोटाळ्याला आज एक नवं वळण लागलं. सीएनएन-आयबीएनच्या हाती असलेल्या कागदपत्रानुसार या घोटाळ्यासाठी एकटे कलमाडी जबाबदार नाही. केंद्र सरकारने आयोजन समितीवर नेमेलेल्या जर्नेल सिंग यांनी आणि कॉमनवेल्थ फेडरेशनने सुद्धा या वादग्रस्त कराराची शिफारस केली होती. तसेच, या कराराला सरकारमधील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाठिंबा दिला होता असाही खळबळजनक खुलासा या कागदपत्रांवरून होतोय.

सुरेश कलमाडी सध्या जेलमध्ये आहेत. 95 कोटी रुपयांच्या टायमर घोटाळ्यात कलमाडी अडकले आहेत. पण आयबीएन-नेटवर्कच्या हाती जी कागदपत्रं लागली आहेत. त्यानुसार टायमर्सचा कॉन्ट्रॅक्ट ओमेगा कंपनीला देण्यासाठी फक्त कलमाडी एकटेच जबाबदार नाही. हे पत्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विश्वासू जर्नेल सिंग यांनी लिहिलंय. आणि त्यात टायमर्सचे कॉन्ट्रॅक्ट स्वीस ओमेगाला देण्याबद्दलची शिफारस आहे. ओमेगाला कंत्राट देऊन एक महिन्यानंतर या सर्व व्यवहाराची माहिती जर्नेल सिंग यांनी क्रीडा मंत्रालयाला दिली.

जर्नेल सिंगही सहभागी?

पहिल्या पानावर जर्नेल म्हणतात, "या निविदांचा विषय हाताळणार्‍या समितीने योग्य पद्धत अवलंबली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे व्यावसायिक शत्रूंनी आणि कंटकांनी हेतुतः केलेत." "सारांश, हा करार आयोजन समितीच्या अर्थविषयक समितीने तपासला होता, ज्यात दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. तसेच, केंद्र सरकारचे तीन विद्यमान सचिव असलेल्या अर्थविषयक उपसमितीने आणि कॉमनवेल्थ फेडरेशननेही त्याला मान्यता दिली आहे."

वादग्रस्त टायमर कराराला कॉमनवेल्थ फेडरेशनचे प्रमुख माइक हूपर यांचीही संमती होती असं सिंग. हूपर यांच्या ईमेलचा हवाला देत लिहितात. जसे की आपल्याला ठाऊक असेल, स्विस घड्याळांचा आणि मोठाल्या क्रीडा सोहळ्यांचा जुना संबंध आहे. आयोजन समितीला जर योग्य वाटत असेल, तर गेल्या दोन कॉमनवेल्थ खेळाप्रमाणे, यंदाही स्विस टायमर्स यावेत या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल."

आपला बचाव करताना जर्नेल सिंग म्हणतात की या कराराला पाठिंबा देण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. कलमाडींच्या या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिला नसता, तर खेळ धोक्यात आले असते, असा दावा ते करतात. कॉमनवेल्थचे अध्यक्ष माईक फनेल यांनीही काहीशी अशीच भूमिका घेतली. पण या कराराला पाठिंब्याची पत्रं लिहिणारे हे सर्व बडे अधिकारी इतके दिवस का शांत होते या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही.

इतरांचीही चौकशी व्हायला हवी – रविशंकर प्रसाद

कलमाडी एकटेच दोषी नाहीत. इतरांचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केली. तर कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

close