वैमानिकांच्या संपाच तिसरा दिवशीही टेक ऑफ

April 29, 2011 9:38 AM0 commentsViews: 1

29 एप्रिल

एअर इंडियाच्या पायलट्सनी सुरू केलेल्या संपाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे. आता संपात जवळपास सगळेच पायलट सहभागी झाले आहेत. आतापर्यंत 850 पैकी 840 पायलट संपात सहभागी झालेत. आज सकाळपासून 30 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम एअर इंडियाच्या तिकिट बुकींगवर झाला आहे. एअर इं़डियाने पुढच्या पाच दिवसांची बुकींग बंद केली आहेत. दरम्यान आयसीपीएचं ऑफिस एअर इंडियाने सील केलं होतं त्याचे आज सील उघडण्यात आले आहे. ते ऑफिस आज पासून पुन्हा सुरु झालं आहे.

close