महिला पोलीस लैगिंक शोषण प्रकरणाच्या तपासाला वेग

April 29, 2011 9:51 AM0 commentsViews: 82

29 एप्रिल

कोल्हापुरातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीसाचं लैगिंक शोषण प्रकरणाचा गूढ आता वाढलं आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाल्यानंतर तपासालाही वेग आला आहे. यातील दोषी अधिकार्‍यांवर कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे.

दरम्यान याप्रकरणी तपासाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या मैथिली झा आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक चौकशी अहवाल देणार असल्याचे काल गुरूवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कोल्हापुरात सांगितले आहे. दरम्यान चौकशीचा प्राथमिक अहवाल आज सादर होईल असं मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितलं. चौकशीत कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले.

close