टाटा आणि रिलायन्सच्या प्रकल्पासाठी दिली सुपीक जमीन !

April 29, 2011 10:10 AM0 commentsViews: 10

29 एप्रिल

रायगडमध्ये टाटा आणि रिलायन्सला उर्जा प्रकल्पासांठी देण्यात येणारी रायगडमधील जमीन सुपीक असल्याचं मान्य करतं सरकारी अधिकार्‍यांनीच तस पत्रच आंदोलकांना दिलं. पण या बैठकीचं इतिवृत्तांत मागण्यासाठी गेलेल्या 100 महिला आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. फक्त ओसाड किंवा नापीक जमिनी संपादन करणार असल्याचा सरकारी दावा आता खोटा पडला आहे.

टाटा आणि रिलायन्स यांच्या औष्णिक ऊर्जाप्रकल्पांसाठी बेकायदेशीरपणे भूसंपादन होत असल्याचा आरोप अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांनी केला आहे. या दोन प्रकल्पांसाठी साडे सहा हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जातं आहे. याविरोधात मागच्या पाच दिवसापासून नवी मंुबईतील कोकणभवनला शेकडो शेतकर्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत कोंकण विभागीय आयुक्त एस एस संधू यांनी बैठक बोलवली. पण या बैठकीला टाटा आणि रिलायन्स यांच्या अधिकार्‍यांनाही बोलवल्याने हा वाद आणखीनच चिघळला. यावेळी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाबरोबर गेलेल्या पत्रकारांनाही जाणूनबूजून बाहेर ठेवण्यात आलं. बैठकीनंतरही शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

close