के. बालचंद्रन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

April 29, 2011 12:09 PM0 commentsViews: 4

29 एप्रिल

के. बालचंद्रन यांना 2010 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. पटकथा लेखक, चित्रपट निर्माते आणि निर्देशक म्हणून त्यांना चित्रपट सृष्टीत ओळखल जाते. तामीळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड भाषेतील अंसख्य चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केलं. 1987 मध्ये त्यांना पद्मा श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर 2011 मध्ये त्यांना आध्रप्रदेश सरकारकडून नॅशनल अवार्ड मिळाला.

आजपर्यंत प्रादेशिक फिल्म कॅटेगरीत बालचंदर यांनी 4 राष्ट्रीय फिल्म पुरस्कार पटकावले आहेत. डायरेक्शन आणि पटकथेसाठी ते खास ओळखले जातात. तामिळ सिनेमात नवे चेहरे आणण्याचे श्रेय बालचंदर यांना जातं. कमल हसन, रजनिकांत, प्रकाश राज आणि विवेक या चेहर्‍यांना त्यांनीच जगासमोर आणलं आहे. त्यांनी कविथालय या प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली.

close