शिवसेनेच्या आमदारांना कानपिचक्या ; मनसेत कौतुक !

April 29, 2011 10:54 AM0 commentsViews: 7

29 एप्रिल

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवसेना आणि मनसेने आपापल्या आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन केलं. या मूल्यमापनामुळे दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये नेमका काय संदेश गेला याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

शिवसेना आमदारांची शिवसेनाप्रमुखांनी कानउघाडणी केल्यानंतर हीच नामीसंधी साधत मनसेप्रमुख राज ठाकरेंनी आज आपल्या आमदारांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. मनसेअध्यक्ष एकीकडे आपल्या आमदारांचे कौतुक करत असताना शिवसेनेनं मात्र आमदारांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. या खरडपट्टीनंतर शिवसेनेच आमदार मात्र बिथरले. यावर काय नेमकी प्रतिक्रिया द्यावी याचंही भान त्यांना उरलं नाही.

अधिवेशनाच्या काळात या दोन्ही पक्षांच्या आमदारांची कामगिरी अगदी नजरेत भरण्याइतकी ठळक नव्हती. पण तरीही मनसेच्या आमदारांना शाबासकी मिळाली, तर शिवसेनेच्या आमदारांना कानपिचक्या. हे सगळे आता आगामी महापालिकेच्या निवडणुकाच नजरेसमोर ठेवून होतंय हे स्पष्ट आहे. या दोन्ही गोष्टींचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कुणाला किती फायदा होईल हे आगामी काळातच दिसून येईल.

close