प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे कायम

April 29, 2011 12:37 PM0 commentsViews: 107

29 एप्रिल

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी माणिकराव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सचिव जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा दिल्लीत केली. 2008 साली माणिकरावांची पहिल्यांदा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते विधानपरिषदेचे आमदार आहेत. सेवाग्राम इथल्या सोनिया गांधींच्या रॅलीपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फंड उभारण्यासंदर्भात त्यांनी केलेलं संभाषण गाजलं होतं. त्यामुळे ते अडचणीत आले होते. पण आता मुंबई काँग्रेस अध्यक्षाचे काय होणार याची ही चर्चा सुरु झाली आहे.

close