महिला पोलीस बलात्कार प्रकरणात अधिक्षकांची बदली तर 2 जण निलंबित

April 29, 2011 2:09 PM0 commentsViews: 7

29 एप्रिल

कोल्हापूरातील महिला पोलीस प्रशिक्षणार्थी झालेल्या बलात्कार प्रकरणात कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक यशस्वी यादव यांची बदली करण्यात आली आहे. तर हेडकॉन्स्टेबल युवराज कांबळे, डीवायएसपी विजय परकाळे आणि ज्ञानेश्वर मुंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेदत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली.

या प्रकरणात एकूण 71 टेस्ट करण्यात आल्या. त्यातल्या दोघी गरोदर असल्याचे स्पष्ट झालं आहे असंही आर. आर. पाटील यांनी सांगितले आहे. याप्रकरणात युवराज कांबळेला निलंबित करून अटक करण्यात आली. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्या जे दोषी आढळतील ते पोलीस सेवेत राहणार नाहीत मैथिली झा यांचा अंतरिम रिपोर्ट आलेला आहे.

पण मीरा बोरवणकर सध्या रजेवर आहेत त्या परतल्यानंतर हे प्रकरण बघतील. त्यानंतर चार्जशीट दाखल केलं जाईल. येत्या आठ ते दहा दिवसात याचा सविस्तर रिपोर्ट येईल असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. पोलीस अधिक्षक यशस्वी यादव यांना सध्या कुठलंही पोस्टिंग दिलं जाणार नाही. तसेच उद्या मैथिली झा याप्रकरणातल्या संबंधित 71 मुलींना भेटून त्यांची चौकशी करणार आहेत असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहे.

close