मिनाक्षी पाटील यांचं नगरसेवक पद रद्द

April 29, 2011 5:56 PM0 commentsViews: 19

29 एप्रिल

शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. वार्ड क्रमांक 111, कांजुर गावच्या या नगरसेविका आहेत. अनाधिकृत बांधकाम प्रकरणी त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं गेलं आहे. महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तारानाथ शेट्टी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने आयुक्तांना पद रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनाधिकृत बांधकाम प्रकरणात मिनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद रद्द केलं गेलं आहे. पद रद्द केलं जाणार्‍या त्या पहिल्याच नगरसेविका आहेत.

close