अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबद्दल गुढ कायम

April 30, 2011 9:27 AM0 commentsViews: 4

30 एप्रिल

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्याबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरचा शोध अजून लागलेला नाही. हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्यासह पाच जण आहेत. हेलिकॉप्टरचे भूतानमध्ये लँडिंग झाल्याचे सुरुवातीला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले होते. पण भारताच्या भूतानमधील राजदुतांनी याला नकार दिला आहे.

तवांगहून इटानगरला जाण्यासाठी हेलिकॉप्टरने सकाळी 9:50 वाजता उड्डाण केलं. हेलिकॉप्टर इटानगरमध्ये सकाळी 11.30 वाजता लँड होणं अपेक्षित होतं. पण पण उड्डाणानंतर काही वेळातच तेजपूरमधील मिसामारी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. तेव्हापासून हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागलेला नाही.भूतान सरकार आणि लष्कराने अरुणाचल प्रदेशातील 7 सीमावर्ती जिल्ह्यात शोधमोहीम सुरू केली आहे. या भागातल्या खराब हवामानामुळे हवाई शोधमोहीम कठीण बनली आहे. हेलिकॉप्टर नेमकं कुठं बेपत्ता झालं याबद्दल काहीच माहिती नसल्याने जमिनीवरच्या शोधमोहिमेतही अडचणी येत आहेत.

close