वैमानिकांचा संप सुरूच ;126 फ्लाईट्स रद्द

April 30, 2011 9:42 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

एअर इंडियाच्या पायलट्सचा संप सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत 126 उड्डाण रद्द करण्यात आली आहे. आणखीही काही उड्डाण रद्द होण्याची शक्यता आहे. तर फक्त 39 फ्लाईट्सनी आतापर्यंत टेक ऑफ घेतला आहे. 700 पेक्षा जास्त पायलट्स संपावर गेलेले आहेत आणि पायलट्स जोपर्यंत माघार घेत नाहीत तोपर्यंत बोलणी करण्यासाठी एअर इंडियाच्या मॅनेजमेंटने नकार दिला आहे. एअर इंडियाने किंगफिशर पायलट्सना भाडेतत्वावर घेतले आहे. तसेच संपावर असलेल्या 85 पायलट्सना टर्मिनेट करण्यात आलं आहे.

close