विंदा आजोबांच्या कवितांसाठी बच्चे कंपनीची गर्दी

November 9, 2008 4:57 PM0 commentsViews: 128

9 नोव्हेंबर, पुणेज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम कवी विंदा करंदीकर एका वेगळ्या रूपात पुणेकरांना पहायला मिळाले. नव्वदीतल्या विंदांनी बालगोपाळांमध्ये मिसळून कविताही म्हटल्या. 'आर्या कम्युनिकेशन्स ' आणि 'संवाद ' यांनी 'विंदा आजोबांच्या कविता ' हा खास कार्यक्रम भरवला होता. यावेळी मुलांनीच मानपत्र देऊन विंदांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या कवितांच्या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. मग तासभर विंदा मुलांमध्ये रमले. विंदा आजोबांच्या कविता त्यांच्याचकडून ऐकायला मिळत असल्यानं असल्यानं मुलं बेहद्द खूश होती. 'विंदा आजोबांच्या कविता ऐकायला मी आली आहे. आमच्या शाळेत सुद्धा त्यांनी कार्यक्रम केला होता आणि अजून त्यांच्या कविता ऐकायच्यात ', असं लहानगी स्वानंदी केळकर सांगत होती. बच्चेकंपनीबरोबरच त्यांच्या पालकांनीही ही संधी सोडली नाही. गेले तीन दिवस विंदा पुणे मुक्कामी आहेत. केशवसूत पुरस्काराच्यावेळी त्यांनी त्यांच्या आणि केशवसूतांच्या कविता म्हटल्या. काल पुलोत्सवात त्यांनी पुलंच्या आठवणी जागवल्या.

close