नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारकडे

April 30, 2011 9:58 AM0 commentsViews: 3

30 एप्रिल

मुंबई नागपूरसह सर्व महापलिकांच्या अधिनियमांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या सर्व महापालिका आयुक्तांचे अधिकार वाढवण्यात आले. तसेच महापालिकांचा कारभार राज्यसरकारच्या हातात राहील यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणांना मान्यता देण्यात आली.

त्यानुसार एखाद्या नगरसेवकाला अपात्र ठरवण्याचा अधिकार राज्यसरकारने स्वत:कडे घेतला आहे. तसेच गैरवर्तणूक करणार्‍या महापौर आणि उपमहापौराचं नगरसेवकपद काढून घेतलं जाईल सोबतच त्याला 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असा महत्तवाचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. अशाच प्रकारच्या अनेक सुधारणाच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांच्या अधिकारात राज्यसरकारने वाढ केली आहे.

close