पुणेकरांच्या भेटीला कोकणचा राजा

April 30, 2011 10:25 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

पुणेकरांना कायमच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळत असते. पण खवय्या पुणेकरांना आता मात्र अस्सल कोकणी मेवा चाखण्याची संधी मिळत आहे. कारण पुण्यात सध्या कोकण आणि आंबा महोत्सव असे दोन महोत्सव सुरु आहेत. पुण्यातील बालगंधर्वमध्ये खास पर्वणी आहे ती म्हणजे आंबा महोत्सवाची.

मनसेनं आयोजित केलेल्या या महोत्सवात विविध प्रकारचे आंबे आणि आंब्यापासून बनवलेले पदार्थ इथं चाखायला मिळत आहे. त्याबरोबरच कोकम सरबत, आंबा वड्या, कैरी डाळ आणि पन्ह्याची मेजवानी सध्या पुणेकरांना मिळत आहे. अत्रे सभागृहात सुरु असलेल्या या कोकण महोत्सवामध्ये पुणेकर गर्दी होत आहे.

close