पुणे आणि नाशकातून चार नक्षलवाद्यांना अटक

April 30, 2011 10:31 AM0 commentsViews: 2

30 एप्रिल

मुंबई एटीएसने चार नक्षलवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये 3 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. यापैकी 3 महिलांना पुण्यातून, तर नाशिक जिल्हाच्या चादंवड मधून एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. एटीएस प्रमुख राकेश मारीया यांनी ही माहिती दिली. चारही जणांना आज कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

कोर्टाने त्यांना 3 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. चादंवड इथून अटक करण्यात आलेल्या युवकाच नाव सिध्दार्थ भोसले असून तो मुळचा चंद्रपूरचा आहे. या पूर्वी ठाण्यातून अँजेलो सोनटक्के आणि सुषमा रामटेके या महिला नक्षलवाद्यांना अटक केली होती. दोघींनाही 3 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close