राजु शेट्टी यांची पाणी आणि भ्रष्टाचार विरोधात संघर्ष यात्रा

April 30, 2011 10:51 AM0 commentsViews: 104

30 एप्रिल

शेतकर्‍यांचा पाण्यावरील हक्क कायम राहिला पाहिजे त्याच बरोबर सर्वच पातळयावर बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबद्दल समाजात चीड निर्माण व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सत्याग्रह पाण्याचा आणि पंचनामा भ्रष्टाचाराचा ही संघर्ष यात्रा सुरु केली आहे. या संघर्ष यात्रेला आज चांदोली आणि रा़धानगरी अशा दोन धरणापासून सुरवात झाली आहे.

चांदोली धरणापासून सुरु झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व खासदार राजु शेट्टी करत आहे. तर राधानगरी धरणापासून सुरु झालेल्या संघर्ष यात्रेचं नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत करताय्. एकुण 250 किलोमीटरची पदयात्रा सलग सात दिवस चालणार आहे. या यात्रेचा समारोप कोल्हापुरातल्या दसरा चौकात होणार आहे.

या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. पहिल्यांदा प्राधान्य पिण्याच्या पाण्याला, दुसरं प्राधान्य शेतीला आणि नंतर उद्योग धंद्याला द्यावे अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. जर सरकारने उद्योग धंद्याला दुसरं प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी गप्प बसणार नाहीत अशी भूमिका आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांची आहे.

close