अणुऊर्जेचे धोके जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत – रामदेव बाबा

April 30, 2011 11:01 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

योगगुरु रामदेव बाबांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. जगभरात अणुउर्जा प्रकल्पाविषयी फेरविचार चालु असताना भारत सरकारने बळाचा वापर करून प्रकल्पविरोधी आंदोलनांना दडपू नये असं सांगत अणुऊर्जेचे धोके सुध्दा जनतेपुढे पारदर्शकतेने मांडले पाहिजेत असं मत व्यक्त केलं आहे. जैतापूरच्या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्याबाबत लवकरच विचार केला जाईल असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

close