मुख्यमंत्री विधान परिषदेत

April 30, 2011 12:34 PM0 commentsViews: 5

30 एप्रिल

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषेदच्या सदस्यत्वची शपथ घेतली. गेल्या वर्षी नोव्हेबर मध्ये मुख्यमंत्री बनल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सहा महिन्याच्या आत आमदार बनणे बंधनकारक होते. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेचे आमदार बनले आहे.

गेल्या बुधवारी चव्हाण यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती त्यानुसार आज त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली. या वेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि उपसभापती वसंत डावखरे आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह अनेक नेते उपस्थीत होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपाध्ये तथ्य आहे, असा पुनरुच्चार केला.

close