मला डरकाळी फोडणारे मराठे हवे आहेत – शिवसेनाप्रमुख

April 30, 2011 5:49 PM0 commentsViews: 7

30 एप्रिल

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आकाशातून टिपलेल्या पंढरीच्या वारीतल्या छायाचित्रांचे संकलन असलेल्या 'पहावा विठ्ठल' या ग्रंथाचे प्रकाशन आज झालं. नित्यनेमाणे वारीला जाणार्‍या पाच वारकर्‍यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं. वरळीतील जांभोरी मैदानावर हा कार्यक्रम झाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेबांनी आपण शिवसेना आमदारांना खडसावल्याचे मान्य केलं. मला डरकाळी फोडणारे मराठे हवे आहेत, असं बाळासाहेब म्हणाले. कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेशबंदीवर त्यांनी टीका केली. एकीकडे महिलांना आरक्षण देता, दुसरीकडे त्यांना मंदिरात प्रवेश नाकारता हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. धर्मात राजकारण नको असं म्हणताना त्यांनी देशवासीयांना योग्य दिशा दाखवण्याचं साकडं विठ्ठलाला घातलं.

close